मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
दुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कारपालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेशडीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाकपिंपरी-चिंचवडने कर्जाचे पाणी पिण्याचा मार्ग स्वीकारलाअजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर;कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फलकपुण्यात साडेबारा कोटींची बिले अदा, वृक्षलागवड कागदावरच

डीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक

चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

डीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक
चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पोलीस उपायुक्तांना फोन का केला, अशी विचारणा करीत व्यावसायिकाला शिवीगाळ करीत पोटाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तळवडे-रुपीनगर येथे १४ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी मेहबुब लियाकत शेख (वय ४२, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 'सत्ता कंपनी' टोळीचा सदस्य स्वप्निल वाघमारे (रा. तळवडे रोड), अमिन कबीर शेख आणि रशीद शेख (दोघे रा. निगडी, ओटास्कीम) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी मेहबुब शेख हे रुपीनगर येथील माऊली हॉटेलसमोर आले असता आरोपी अमिन आणि रशीद हो दोघेजण तिथे आले. त्यांनी 'पोलीस उपायुक्तांना फोन का करतो?' अशी विचारणा करीत फिर्यादी यांना पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ केली. तसेच, "तुला जीवे मारेल, मुलाला उचलून नेईल, मुलाला जीपीएस लावून ठेव," अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल फडतरे तपास करीत आहेत.

तर अमिन कबीर शेख (वय ३८, रा. निगडी, ओटास्कीम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मेहबुब लायकत शेख (रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत थोरात यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचे सांगत मेहबूब शेख याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास रुपीनगर पोस्ट ऑफिसजवळ आरोपीने फिर्यादी यांच्या खिशातील त्यांच्या पत्नीने दिलेले ५० हजार

रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, उर्वरित रक्कम न दिल्यास संपवण्याची धमकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper