Kohlapur News : पुढच्या दारातून प्रवेश मिळेना, म्हणून चोर खिडकीतून एन्ट्री
Kohlapur News : गोकुळमधील हस्तक्षेपावरून वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Kohlapur News : कोल्हापूर: सत्तेच्या हव्यासापोटी कायद्याची मोडतोड करून गोकुळची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढच्या दारातून प्रवेश मिळाला नाही, म्हणून चोरासारखं मागच्या खिडकीतून शिरून सत्ता बळकावण्याचा प्रकार सुरू आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला ‘कोरम’संदर्भातील दावाही फेटाळून लावला.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राज्य सरकारच्या हस्तक्षेपावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, कायद्याची मोडतोड करून आणि जनाधाराचा अवमान करून केवळ सत्तेच्या हव्यासापोटी गोकुळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य आणि देश कमिशनखोरीमुळे बरबाद केल्याचा आरोप करत, त्याच पद्धतीने गोकुळचेही नुकसान करण्यासाठी सत्तेची गरज आहे. सत्तेसाठी तीन-तीन मंत्री, बारा-बारा आमदार आणि खासदार असे सर्वजण प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. पुढच्या दारातून प्रवेश मिळत नाही, म्हणून आता मागच्या खिडकीतून आत शिरून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
मुख्यमंत्र्यांचा ‘कोरम’चा दावा फेटाळला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरमअभावी बैठक रद्द झाली असती, तर निवडणूकच रद्द झाली असती, असा दावा केला होता. वडेट्टीवार यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगत त्याला विरोध केला. “पहिल्या बैठकीला कोरम पूर्ण झाला नसता, तरी बहुमताने अध्यक्ष निवडता येतो. न्यायालयानेही १० तारखेला सर्व २५ संचालकांनी उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपस्थित न राहण्याचा किंवा निवडणूक रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने हा उपद्व्याप केल्याचा आरोप करत, या प्रकरणात न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. न्यायालय जनमताचा कौल कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


