मुंबई

Mumbai News : MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; पेपरफुटीच्या वेळी भीमनवार पदावर नव्हतेच!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Mumbai News :’एमपीएससी आंदोलन आता विद्यार्थ्यांचे राहिले नसून राजकीय इव्हेंट; पालघरमधील ‘सेवा संकल्प अभियान 2026′ मध्ये फडणवीसांचा घणाघात’

Mumbai News :पालघर :- पालघर येथे आयोजित ‘सेवा संकल्प अभियान 2026’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “ज्या वेळी स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार किंवा पेपरफुटी झाली, त्या वेळी भीमनवार हे या पदावर जॉईनच झालेले नव्हते. जे त्या काळात पदावर नव्हतेच, त्यांचा राजीनामा थेट कसा घेता येईल? शिवाय, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो राष्ट्रपतींकडे असतो. आम्ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करायला तयार आहोत. या चौकशीत जुने अधिकारी किंवा भीमनवार दोषी आढळल्यास कलम 317 नुसार त्यांना हटवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली जाईल.”https://maharashtramirror.com/ Mumbai news

‘एमपीएससी आंदोलन आता राजकीय इव्हेंट; हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान’

पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला हे आंदोलन MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे होते, परंतु आता ते पूर्णपणे राजकीय आंदोलन झाले असून एका ‘इव्हेंट’सारखे चालवले जात आहे. माननीय उच्च न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवून आंदोलनकर्त्यांना तेथून हटण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही न्यायालयाचा अवमान करून काही मंडळी तेथे बसून आहेत. तरीही आमचे सरकार चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि न्यायाचा मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button