मुंबई

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट

•Pratap Sarnaik meets Sanjay Raut राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम; दोन्ही नेत्यांनी फेटाळल्या कोणत्याही राजकीय विलिनीकरणाच्या चर्चा

मुंबई :- शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राजकीय विरोधक बनलेले शिंदे गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील सदिच्छा भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ऐन दिवाळीच्या सणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, या भेटीमागे कोणतेही राजकीय उद्देश नसून पूर्णपणे कौटुंबिक आणि सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही नेत्यांच्या आईंचे जुने व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने दिवाळीनिमित्त परस्परांची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले.

“केवळ दिवाळीनिमित्त आले होते, यात कोणतेही राजकीय संकेत नाहीत” — संजय राऊतांचे स्पष्टीकरण

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात शिवसेना पुनर्रचना किंवा विलिनीकरणाबाबत विविध तर्क-कुतर्क लढवले जाऊ लागले. मात्र, खुद्द खासदार संजय राऊतांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत, या भेटीला कोणताही राजकीय रंग देऊ नये असे स्पष्ट केले. प्रताप सरनाईक घरी आले असता त्यांनी लाडू-चकलीचा आस्वाद घेतला आणि आईचा आशीर्वाद घेऊन निघून गेले, यापलीकडे यामध्ये कोणतेही राजकीय राजकारण किंवा भविष्यातील युतीचे संकेत नाहीत, असे राऊतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तीव्र राजकीय संघर्ष सुरू असतानाही सणासुदीच्या निमित्ताने जुने संबंध जपणाऱ्या या नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुल्यात मात्र बरीच खळबळ उडवून दिली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button