Pune Crime : मोक्का प्रकरणातील फरार तुषार हंबीर अटकेत; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का प्रकरणात मागील काही काळापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा.
2 मिनिट वाचन

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का प्रकरणात मागील काही काळापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर, पुणे) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २९ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरातून ताब्यात घेतले. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे आणि मोबाईल सिम बदलत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
राजगड येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच खंडणी मागितल्याच्या आरोपावरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत..https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा पृथ्वीराज हा कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्याने अॅक्टिव्हावरून घरी जात होता. कापूरहोळ येथील गुरुकृपा मेडिकलसमोर एका कारचालकाने त्याच्या दुचाकीसमोर कार आडवी घातली. त्यानंतर कारमधील इतर आरोपींनी पृथ्वीराजला बळजबरीने कारमध्ये बसविल्याचा आरोप आहे. आरोपींनी त्याला, “तुम्ही आमच्यावर केसेस करणार, मग आम्ही तुम्हाला सोडणार का?” अशी धमकी दिली. तसेच, त्याच्या तोंडात पिस्तुलाची नळी घालून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेदरम्यान काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले होते; मात्र तुषार हंबीर फरार होता.
या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची बैठक घेऊन त्याला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तुषार हंबीर हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर त्याला फुरसुंगी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
तुषार हंबीर याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, मारामारी आणि शस्त्र अधिनियमाशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे तसेच पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर करीत आहेत.




