मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

Tree: कर्जतमधील वृक्षतोडीच्या भरपाईसाठी १.६५ लाख झाडे लावणार

टोरंट पॉवरचा मुंबई उच्च न्यायालयात दावा - वृक्षतोडीला बेकायदा परवानगी दिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

वृक्षलागवड

Tree मुंबई, महाराष्ट्र मिरर : कर्जत तालुक्यातील तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ३२ हजार ४०० झाडे तोडली जाणार असल्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणीय वाद निर्माण झाला आहे. या वृक्षतोडीची भरपाई म्हणून कर्जत आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एक लाख ६५ हजार झाडे लावली जात असल्याचा दावा टोरंट पॉवर कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात केला. दुसरीकडे, प्रकल्पासाठी वनजमिनीचा वापर बदलण्याची आणि वृक्षतोडीची परवानगी देताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद यांनी जनहित याचिकेतून केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने कंपनीला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देत पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद यांनी प्रकल्पासाठी होणाऱ्या हजारो झाडांच्या वृक्षतोडीला आणि वनजमिनीच्या वापरातील बदलाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, ती सूचीबद्ध न झाल्याने मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे ती सादर करण्यात आली. त्यावेळी टोरंट पॉवर कंपनीच्या वतीने प्रकल्पाला यापूर्वीच विविध पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

कर्जतमध्ये ७५ हजार, साताऱ्यात ९० हजार झाडे

वृक्षतोडीच्या भरपाईसाठी आतापर्यंत कर्जत येथे ७५ हजार झाडे लावण्यात आल्याचा दावा कंपनीने केला. याशिवाय, सातारा जिल्ह्यात वनक्षेत्रासाठी जमीन उपलब्ध करून तेथे आणखी ९० हजार झाडे लावली जात असल्याचे कंपनीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण एक लाख ६५ हजार झाडांची लागवड केली जात असल्याचा कंपनीचा दावा आहे. याचिकेत प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आक्षेपही कंपनीने घेतला.

३७७ हेक्टर जमिनीवर प्रकल्पाचे नियोजन

टोरंट कंपनी कर्जत तालुक्यात १३ हजार ५०५ कोटी रुपये खर्चाचा पंप स्टोरेज प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी एकूण ३७७ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यातील २३३ हेक्टर वनजमीन आहे. उर्वरित १४४ हेक्टर जमीन पाच गावांतील असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ३२ हजार ४०० झाडे तोडली जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर