मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

Pune crime: अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी पाहिजे असलेला आरोपी जेरबंद

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगरमधून ताब्यात

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

photo

Pune crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या २० वर्षीय आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. जय नितीन शिंदे (वय २०, रा. विचल नगर, मच्छी मार्केट शेजारी, पाषाण, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे शहरात गुन्हे प्रतिबंधासाठी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संतोष अनुसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जय शिंदे हा शिवाजीनगर येथील एकबोटे कॉलनी परिसरात आला आहे.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना कळविण्यात आली. त्यांनी माहितीची खातरजमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव जय नितीन शिंदे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने दाखल गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी त्याला पुढील तपास व कारवाईसाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) आणि २९ नुसार गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक धिरज राऊत आणि पोलीस अंमलदार बाबा दांगडे, संतोष अनुसे, आशिष खरात, प्रमोद जगताप, संतोष नांगरे तसेच महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक यांनी केली.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर