मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

Pune crime: मांजरीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या चौघांना अटक

५२.६९ ग्रॅम मेफेड्रोनसह २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

drugs
drugs

Pune crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अमली पदार्थ विरोधी पथक-१ने मोठी कारवाई केली. मांजरी येथील जी मॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या आणखी एका तरुणालाही पोलिसांनी पकडले. या चौघांकडून ५२.६९ ग्रॅम मेफेड्रोनसह एकूण २ लाख १८ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जयेश सतीश कांबळे (वय २१, रा. मांजरी बुद्रुक), गणेश शरद शिंदे (वय १९, रा. येरवडा) आणि शोएब हसन शेख (वय २०, रा. येरवडा) या तिघांना ताब्यात घेतले.

अमली पदार्थ विरोधी पथक-१चे अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार किरण जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने जी मॉल, मांजरीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १ लाख ५८ हजार ७० रुपये किमतीचे ५२.६९ ग्रॅम मेफेड्रोन आढळले. याशिवाय १ लाख १० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे चार मोबाईल हँडसेट आणि ३० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण २ लाख १८ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मेफेड्रोन कुठून आणला, याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तो रोहन राजेंद्र थोरात (वय २१, रा. येरवडा, पुणे) याच्याकडून आणल्याची माहिती तिघांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहनचा शोध घेऊन त्याला राहत्या परिसरातून ताब्यात घेतले.

या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(अ) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) तथा गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले संजय पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथक-१च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, महिला पोलीस उपनिरीक्षक आशा भिंगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल साळुंखे, संजय राजे आणि पोलीस अंमलदार अविनाश रेडके, तुषार साळुंके, विशाल भिलारे, अतुल क्षीरसागर, अमरनाथ लोणकर, निलेश जाधव, किरण जाधव, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर