मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Spa Sex Center : “स्पा सेंटर की वेश्याव्यवसाय केंद्र?” — पुण्यात 18 मुलींची सुटका; परदेशी तरुणींनाही बनवलं होतं ‘शिकार’!

Pune Police Busted Spa Sex Center : विमानतळ व बाणेर परिसरात पोलिसांचा धडक छापा; उच्चभ्रू भागांत चालत होता अनैतिक धंदा

V
Vivek

1 मिनिट वाचन

spa sex racket

Pune Police Busted Spa Sex Center : विमानतळ व बाणेर परिसरात पोलिसांचा धडक छापा; उच्चभ्रू भागांत चालत होता अनैतिक धंदा

पुणे | शहरातील हाय-प्रोफाईल स्पा सेंटरच्या आड लपलेला एक भयाण वेश्याव्यवसायाचा चेहरा पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाला आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात झालेल्या छापेमारीत 18 मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यात 10 हून अधिक परदेशी मुली आणि दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. Pune Police Latest Crime News

पोलीस तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, 'किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे' (वय 28, रा. खराडी) हिने गरिबी आणि विवशतेचा फायदा घेत अनेक तरुणींना स्पा सेंटरमध्ये काम देण्याचे आमिष देऊन देहव्यवसायात ढकलले. यामध्ये 15 आणि 17 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने प्रकार अधिक गंभीर बनतो.

विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये झालेल्या कारवाईत 16 मुलींची सुटका करण्यात आली, ज्यात 10 परदेशी, 2 भारतीय आणि 4 इतर देशीय नागरिक असल्याचे समोर आले आहे.त्याचवेळी बाणेर येथील स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 मुलींची सुटका झाली. या दोन्ही ठिकाणच्या स्पा मालक, व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली. पोलिसांना स्पष्ट संकेत मिळाले होते की ‘मसाज’च्या नावाखाली शरीर विक्रीचा काळा बाजार येथे सुरू आहे. घटनास्थळी धडक देताच अनेक तरुणी भीतीने थरथरत असल्याचे पोलिसांना दिसले.

शेअर करा