मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : "माझ्या वाक्याचा विपर्यास केला"; शरद पवार यांचे पत्रकार परिषदेत त्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे शरद पवार यांचे वादग्रस्त विधान

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे शरद पवार यांचे वादग्रस्त विधान

सातारा :- शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. पण आता स्वतः पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच मोठे काम केल्याचेही ते म्हणालेत.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विषयी मी जे वक्तव्य केले, ते अजित पवार यांच्या विषयी मला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केले होते. वास्तविक मी कायमच महिलांचा सन्मान केला आहे. देशामध्ये सर्वात आधी महिला आरक्षण लागू करण्याचा निर्णय मी घेतला होता. खासगी क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षणाचा निर्णय देखील मी घेतला होता. मी केंद्रात संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलांमध्ये महिलांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी कायमच महिलांचा सन्मान केला असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, या सर्व स्पष्टीकरणामागे सुनेंत्रा पवार यांच्या विषयी शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आहे. सुनेत्रा पवार या पवार घराण्यातील नसून बाहेरून आलेल्या उमेदवार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यामुळे आता शरद पवार यांनी स्वतः याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

सातारामध्ये आमचे नाणे खणखणीत असल्याचा दावा

सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे नाणे खणखणीत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. येथील मतदार हे पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे हे विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा