मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Medical News : रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित

जादा आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित
रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित

Pune Medical News : जादा आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई


Pune Medical News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रामधील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी हे दर लागू राहणार असून, निश्चित दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णवाहिकांकरिता निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणार्या वाहनचालक, मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अचर्ना गायकवाड यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune Medical News
सुधारित दरानुसार, अवातानुकुलीत मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी ७०० रुपये, त्यानंतर प्रति किलोमीटर १६ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. इंधन, देखभाल-दुरुस्ती व चालक वगळून १ हजार रुपये प्रतिदिन दर राहणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune Medical News
अवातानुकुलीत मारुती ईको व टाटा मॅजिकसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी ९०० रुपये, त्यानंतर १७ रुपये प्रति किलोमीटर आणि १२५ रुपये प्रतीक्षा शुल्क प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
अवातानुकुलीत महिंद्रा बोलेरो व फोर्स क्रुझरसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी १ हजार २०० रुपये, त्यानंतर १८ रुपये प्रति किलोमीटर आणि १५० रुपये प्रतीक्षा शुल्क प्रतितास आकारता येईल. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ५ हजार रुपये दर राहणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune Medical News
अवातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी १ हजार ५०० रुपये, त्यानंतर २५ रुपये प्रति किलोमीटर आणि १७५ रुपये प्रतीक्षा शुल्क प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ७ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
तर वातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी २ हजार ५०० रुपये, त्यानंतर ३० रुपये प्रति किलोमीटर आणि २५० रुपये प्रतीक्षा शुल्क प्रतितास आकारण्यात येईल. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी १० हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. रुग्णवाहिका सेवा घेताना नागरिकांनी वाहनाचा प्रकार, लागू भाडेदर, अतिरिक्त किलोमीटर व प्रतीक्षा शुल्क याबाबत माहिती घेऊन पावतीची मागणी करावी. निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्ते भाडेदर आकारणी करणार्या वाहनमालक, चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून पहिल्या गुन्ह्याकरिता पाच हजार रुपये, दुसर्या गुन्ह्याकरिता दहा हजार रुपये व तिसर्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्याकरिता वीस हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अचर्ना गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी

शेअर करा