मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ravindra Dhangekar : शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा जळजळीत इशारा"…तर नवनाथ बन यांना पुणे आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही"

भाजप प्रवक्त्याच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; 'नवनाथ बन हा पगारी माणूस असून तुकड्यावर जगतोय' अशा शब्दांत काढली वाणवा."

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ravindra Dhangekar : शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा जळजळीत इशारा"…तर नवनाथ बन यांना पुणे आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही"

  • भाजप प्रवक्त्याच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; 'नवनाथ बन हा पगारी माणूस असून तुकड्यावर जगतोय' अशा शब्दांत काढली वाणवा."
  • पुणे :- विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा आता टोकाला पोहोचला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांच्यावर अत्यंत घणाघाती शब्दांत हल्लाबोल केला.

    "नवनाथ बन हे केवळ फोटो काढून दाखवणारे आणि पगारावर काम करणारे व्यक्ती आहेत," असा टोला लगावत धंगेकर म्हणाले की, "जर नवनाथ बन माझ्या लेव्हलला खाली उतरले, तर मी त्यांना पुण्यातच काय पण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही." बन हे नेहमीच कोणाच्यातरी तुकड्यावर जगतात, तर आपण कधीही कुणाच्या मेहरबानीवर जगत नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

    भाजपमध्ये लायकीचे लोक नाहीत का? धंगेकरांचा सवाल

    या वादानरम्यान धंगेकरांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही ताशेरे ओढले. भाजपमध्ये इतर सक्षम आणि पात्र लोक असताना अशा व्यक्तीला पक्षात स्थान देऊन मोठे कसे केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, महायुतीत सर्व काही आटोक्यात नसल्याचे सांगत भाजपमधील अनेक नेत्यांनाही अंतर्गत असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला.

    यापूर्वी नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांवर टीका करताना त्यांना 'माकडछाप' असे संबोधले होते, ज्याला आता धंगेकरांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. या शाब्दिक युद्धामुळे महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही बाजूंमधील दुरावा वाढल्याचे दिसून येत आहे.

    हेही वाचा: Sanjay Raut : ठाणे पोलिसांकडून आंदोलकांवर अ‍ॅसिडचा वापर; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप, उपमुख्यमंत्री शिंदेंना धरले धारेवर

    शेअर करा