मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Spa Sex Racket Busted | विमानतळ : 'मेंशन स्पा' हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट सूत्रधार रहीम-अमित पडद्याआड ?

mansion spa sex racket busted by pune police

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune sex racket busted

  • Pune Spa Sex Racket Busted | परिमंडळ-४ हद्दीतून एकाचवेळी तब्बल १८ मुलींची सुटका
  • पुणे, दि. १० जुलै, महाराष्ट्र मिरर :
    मुबारक जिनेरी

    विमानतळ येथील उच्चभ्रू भागातील हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी मोडून काढले आहे. स्पाच्या नावाखाली चालणारे सेक्स उघडकीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असला तरी 'मेंशन स्पा' हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट सूत्रधार रहीम-अमित अद्याप पडद्याआड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Pune Spa Sex Racket Busted

    परदेशी तरुणी आढळल्याने खळबळ
    मेंशन स्पा सेंटर येथे पोलिसांनी अचानक छापा कारवाई केली असता येथे परदेशी तरुणींची मोठ्या प्रमाणावर सुटका करण्यात आली. परदेशी तरुणींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणारे खरे सूत्रधार कोण याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. Pune Spa Sex Racket Busted, Pune Crime News

    याप्रकरणी पोलीस हवालदार राकेश चांदेकर यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी स्पा मॅनेजर कुणाल दत्तात्रय घोडके, रा.हडपसर, जुनैद शेख व सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध गुरन. ३२८/२०२५ बीएनएस कलम १४३ (३), ३ (५) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
    स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या हाई प्रोफाईल वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर करपे, उपनिरीक्षक नितीन राठोड, अक्षय सोनवणे व पथकाने कारवाई तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा मुड्डेमाल जप्त करण्यात आला. Pune Spa Sex Racket Busted, Pune Crime News

    हेही वाचा: Mumbai Crime News : ‘मकोका’च्या कक्षेत आता ड्रग्स माफिया; महाराष्ट्रात कठोर कारवाईचा मार्ग मोकळा

    https://www.instagram.com/p/DL4v8xGSmVH

    शेअर करा