मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर धडक कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत घडलेल्या खून, दरोडा, घरफोडी आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईचा फास आवळला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर धडक कारवाई
पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर धडक कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत घडलेल्या खून, दरोडा, घरफोडी आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

विहीरीत तरूणाचा मृतदेह आढळला

बारामती तालुक्यातील मौजे वढाणे येथील नारायण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत काशिनाथ ग्यानबा शिंदे (वय २३) या तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात इसमाने कोणत्याही कारणावरून त्याला ठार मारून, हाताला दगड बांधून विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

जेजुरीत स्वीटहोम फोडून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील मौजे लवथळेश्वर येथील ‘काका हालवाई’ दुकानाचे शटर उचकटून तोंडाला मास्क लावलेल्या चोरट्यांनी सहा किलो मिठाई आणि १ लाख ५० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

घरफोडीत चार लाखांचा मुद्देमाल लंपास

हवेली तालुक्यातील गोगलवाडी येथील पिराची वस्ती येथे शंकर विठ्ठल गोगावले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ४५ हजार रुपये रोख आणि ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पुणे-अहिल्यानगर हायवेवर न्हावरे फाट्याजवळ एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील चार अज्ञात इसमांनी एसटी बस अडवली. गाडी घासल्याचा बहाणा करून चालक व वाहकाला मारहाण केली आणि वाहकाच्या खिशातील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच बसची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

शेतजमिनीच्या वादातून एकाला मारहाण

शिरूर तालुक्यातील धामारी येथे शेतजमिनीच्या वाटपाच्या कारणावरून जबाजी रूपनेर, अर्चना रूपनेर यांनी फिर्यादी सोमनाथ रूपनेर यांना शिवीगाळ करत कुऱ्हाडीने, दगडाने मारहाण केली व चावा घेऊन दुखापत केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे जुन्या वादातून प्रतीक शेलार व इतर आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोयता, लोखंडी रॉड आणि गजाने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सोशल मीडीयावरील बदनामीप्रकरणी एकावर गुन्हा

वाणेवाडी येथील बबन लक्ष्मण टेंगले याने फिर्यादी महिला व तिच्या वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट बनवून फिर्यादीचा जुना व्हिडिओ प्रसारित केला व अश्लील मजकूर लिहून व्हायरल केला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तिघांवर कारवाई

तुंगार्ली येथील ‘व्हाईट हाऊस’ बंगल्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, १२ हजार ९०० रुपये रोख जप्त करण्यात आले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

शेअर करा