मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune crime : पुणे शहरातून बारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बारा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे शहरातून बारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
पुणे शहरातून बारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बारा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हे आदेश जारी केले असून, या सर्व आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

तडीपार केलेल्या गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय माहिती: पर्वती पोलीस ठाणे - दीपक प्रकाश गायकवाड (वय २४, रा. जनता वसाहत, पर्वती), चेतन संजय भालेराव (वय २७, रा. दांडेकर पूल), भिमा शत्रुघ्न शिंदे (वय २५, रा. जनता वसाहत, पर्वती), भारती विद्यापीठ पोलीस ठाणे- अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. आंबेगाव पठार), सरफराज उर्फ डर समीर शेख (वय २४, रा. कात्रज), महेश उर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडे नगर, कात्रज)https://maharashtramirror.com/ Pune crime

बिबवेवाडी पोलीस ठाणे- केतन शाम टेमकर (वय २३, रा. अप्पर बिबवेवाडी), खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे (वय २४, रा. इंदिरा नगर, बिबवेवाडी) सहकारनगर पोलीस ठाणे- जितेंद्र उर्फ मोन्या संजय लोंढे (वय २५, रा. तळजाई वसाहत, पद्मावती), रोहन राजेंद्र रोंगे (वय २०, रा. धनकवडी) स्वारगेट पोलीस ठाणे- नरेश उर्फ नब्बा सचिन दिवटे (वय २५, रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड), आंबेगाव पोलीस ठाणे - जितेंंद्र शंकर चिंधे (वय ३२, रा. लिपाणेवस्ती, आंबेगाव / कर्वेनगर) ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते यांनी केली आहे. भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

गंभीर गुन्ह्यांची नोंद:

या सर्व आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्रासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, अग्निशस्त्रे बाळगणे, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि महिलांशी छेडछाड यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

शेअर करा