मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : अंमली पदार्थ तस्करीतील सराईतावर ‘PIT-NDPS’चा बडगा

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करीत सातत्याने सहभागी असल्याचा आरोप असलेल्या सराईत गुन्हेगार शुभम बबन वाघमारे याच्याविरुद्ध ‘PIT-NDPS Act, 1988’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

अंमली पदार्थ तस्करीतील सराईतावर ‘PIT-NDPS’चा बडगा सिंहगड रोड पोलिसांचा प्रस्ताव; शुभम वाघमारेच्या स्थानबद्धतेसाठी पोलीस महासंचालकांकडे कार्यवाही
अंमली पदार्थ तस्करीतील सराईतावर ‘PIT-NDPS’चा बडगा सिंहगड रोड पोलिसांचा प्रस्ताव; शुभम वाघमारेच्या स्थानबद्धतेसाठी पोलीस महासंचालकांकडे कार्यवाही

Pune Crime : सिंहगड रोड पोलिसांची अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या शुभम वाघमारेविरुद्ध कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करीत सातत्याने सहभागी असल्याचा आरोप असलेल्या सराईत गुन्हेगार शुभम बबन वाघमारे याच्याविरुद्ध ‘PIT-NDPS Act, 1988’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांमार्फत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे सादर केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

परिमंडळ-३च्या हद्दीत अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांच्या माहितीनुसार, राजाबाबू रमेश प्रसाद हा अंमली पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यानंतर त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ दाखल करण्यात आला. एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान राजाबाबू प्रसाद याने विक्रीसाठी आणलेला गांजा शुभम बबन वाघमारे याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वाघमारेविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारातील त्याचा कथित सातत्यपूर्ण सहभाग आणि पूर्वीचे गुन्हे विचारात घेऊन त्याच्याविरुद्ध PIT-NDPS कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्तांमार्फत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा