मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : 'हरित पुणे, समृद्ध पुणे' मोहिमेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच उडवला फज्जा

वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून हरताळ

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

PUNE NEWS : 'हरित पुणे, समृद्ध पुणे' मोहिमेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच उडवला फज्जा

वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून हरताळ

महत्वाचे मुद्दे

  • मोहिमेअंतर्गत पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक वृक्ष लावणे, तसेच दोन वर्षे संगोपन करणे बंधनकारक होते
  • लावलेल्या झाडाचे स्थान, प्रजाती आणि छायाचित्रांसह माहिती वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्याच्या सूचना होत्या
  • पण एक महिना झाला तरी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने रोपे लावल्याचे आढळत नाही
  • निलेश राऊत
    पुणे PUNE NEWS
    : जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी पुणे महापालिकेने 'हरित पुणे, समृद्ध पुणे' ही मोहीम हाती घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मोहिमेत पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक वृक्ष लावणे, तसेच दोन वर्षे संगोपन करणे बंधनकारक केले होते. पण वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्याकडून हरताळ फासण्यात आला आहे.PUNE NEWS

    या मोहिमेत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने एक वृक्ष लावणे आणि त्याचे दोन वर्षे संगोपन करून तो जिवंत राहील, याची जबाबदारी त्यांच्यावर होती. लावलेल्या झाडाचे स्थान, प्रजाती आणि छायाचित्रांसह माहिती वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आज जून महिना संपत आला तरी आवाहनाच्या २५ दिवसानंतर ही अद्याप एकाही कर्मचाऱ्याने अथवा अधिकाऱ्याने असा अहवाल सादर केला नसल्याने मोहीम कागदावरच राहिल्याचे दिसत असून, हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच फज्जा उडविल्याचे स्पष्ट झाले आहे.PUNE NEWS

    ७२७ नागरिकांनी केले वृक्षारोपण
    वाढते तापमान, घटते हरित क्षेत्र आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने 'हरित पुणे, समृद्ध पुणे' ही मोहीम हाती घेतली. ५ जून रोजी या अभियानाचा प्रारंभ ही झाला. दरवर्षी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत पावसाळ्यात वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले जाते. त्यात पालिकेने पुणेकरांनाही पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत त्याच दिवशी ७२७ नागरिकांनी वृक्षारोपण केले व त्याची नोंद महापालिकेच्या संकेतस्थळावर केली.

    २० हजार देशी झाडांच्या रोपांची विक्री झाली
    तर उद्यान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाच रुपयांत पाच-सहा वर्षे वाढ झालेली देशी झाडांच्या २० हजार रोपांची ५ जून ते २८ जून पर्यंत विक्री झाली आहे. पण एकीकडे पुणेकर पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे पालिका स्वतःच्या मोहिमेकडे पाठ फिरवत आहे. आजमितीला पुणे महापालिकेत कायम व कंत्राटी असे मिळून सुमारे १८ हजार कर्मचारी आहे. पण यातील एकानेही महापालिका आयुक्तांच्या आवाहना नंतर २५ दिवस उलटले तरी प्रतिसाद दिलेला नाही.PUNE NEWS

    मोहिमेचे गांभीर्यच नाही, ना देणे ना घेणे
    हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याशी महाराष्ट्र मिररने संपर्क साधला असता त्यांनी, महापालिकेच्या किती कर्मचारी व अधिकारी यांनी वृक्षारोपण केले याचा तपशील महापालिकेच्या सांख्यिकी विभागाला गोळा करण्यास सांगितला असल्याचे सांगितले.PUNE NEWS

    तर सांख्यिकी विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्यान विभागाने असे कोणतेही पत्र आम्हाला दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती गांभीर्य आहे याची प्रचिती येत आहे. यातून ही मोहीम केवळ कागदावरच राहिली असल्याचे दिसून येत असून तिचे महापालिकेतील कोणालाही ना देणे ना घेणे असल्याचे दिसून येत आहे.PUNE NEWS

    अहवाल मागविले, सत्य परिस्थिती आयुकांकडे सादर करणार
    उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले, "महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सर्वांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सर्व विभागांकडून पुन्हा एकदा माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. हे अहवाल आल्यावर महापालिकेच्या किती कर्मचारी-अधिकारी यांनी वृक्ष लागवड केली याची सत्य परिस्थिती आयुकांकडे सादर करण्यात येईल."

    PUNE NEWS

    शेअर करा