मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरासह उपनगरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ऑक्टोबरला घटस्थापना
नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

Pune News : नऊ दिवस देवीचा जागर; गरबा-दांडिया, भजन, कीर्तनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; २० ऑक्टोबरला दसऱ्याचा उत्साह

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरासह उपनगरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा रविवारी (दि.११) घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार असून, सोमवारी (दि.१९)अष्टमी व नवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मंगळवारी (दि.२०) विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे.
घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त शुभ मानला जात असून, पुण्यात सकाळी ६.२७ ते ६.५८ हा प्रमुख मुहूर्त असल्याचे पंचांगात नमूद करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११.५७ ते दुपारी १२.४४ या कालावधीत अभिजित मुहूर्तातही घटस्थापना करता येणार आहे. त्यामुळे मंदिरांसह सार्वजनिक मंडळांकडून घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, दुर्गासप्तशती पाठ, होमहवन यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर तरुणाईसाठी गरबा-दांडिया, महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अष्टमी व नवमीला कन्या पूजन, महाप्रसाद आणि विशेष आरती करण्यात येते.
नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि.२०)दसरा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. शस्त्रपूजन, वाहनपूजन, सीमोल्लंघन आणि आपट्याची पाने वाटण्याच्या पारंपरिक कार्यक्रमांसह विविध ठिकाणी रावणदहन व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार असून, तिथीच्या वृद्धीमुळे हे नवरात्र १० दिवसांचे आहे. ११ ऑक्टोबर रोजी रविवारी घरोघरी घटस्थापना केली जाईल.
नवरात्र १० दिवसांचे असल्याने देवीला रोज एक याप्रमाणे एकूण १० माळा अर्पण कराव्यात. संपूर्ण उपवास शक्य नसल्यास पहिल्या व शेवटच्या दिवशी किंवा किमान अष्टमीला उपवास करावा. पूजेदरम्यान नेहमीच्या देवांची पूजा बंद न करता ती नियमित करावी. नंदादीप अचानक विझल्यास घाबरून न जाता तो पुन्हा लावावा.

  • मोहन दाते, पंचांगकर्ते
  • नवरात्रोत्सवातील प्रमुख दिवस:
  • ललिता पंचमी: १५ ऑक्टोबर, गुरुवार
  • श्रीसरस्वती पूजन: १७ ऑक्टोबर, शनिवार
  • महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे): १८ ऑक्टोबर, रविवारदुर्गाष्टमी व महाष्टमी उपवास: १९ ऑक्टोबर, सोमवार
  • विजयादशमी (दसरा) व नवरात्रोत्थापन: २० ऑक्टोबर, मंगळवार (विजय मुहूर्त: दुपारी २:१९ ते ३:०६).
  • ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

    शेअर करा