मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे महापालिकेत कंत्राटी कामगारांना दिवाळीचे मोठे गिफ्ट

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेतील हजारो कंत्राटी कामगारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेत कंत्राटी कामगारांना दिवाळीचे मोठे गिफ्ट
पुणे महापालिकेत कंत्राटी कामगारांना दिवाळीचे मोठे गिफ्ट

Pune News : ३० ऑक्टोबरपूर्वी वेतन अदा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे कडक आदेश

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेतील हजारो कंत्राटी कामगारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२६ महिन्याचे वेतन दिवाळीच्या सणापूर्वीच, म्हणजेच येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत अदा करण्याचे स्पष्ट आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी यासंदर्भात सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांना अधिकृत कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

यंदाचा मुख्य दिवाळी सण पुढील महिन्यात ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. सणाच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये आणि त्यांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने महिना संपण्यापूर्वीच वेतन देण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकाभिमुख निर्णय घेतला आहे.

कार्यालयीन परिपत्रकात सर्व विभागांना ज्या ज्या विभागांमध्ये ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांची सेवा घेतली जात आहे, त्या सर्व ठेकेदारांना चालू महिन्याच्या ३० तारखेपर्यंत कामगारांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. नेहमीच्या नियमानुसार पूर्ण महिना संपल्यानंतर वेतनाची प्रक्रिया केली जाते. परंतु, कामगारांना वेळेत पगार मिळावा यासाठी १ ते २० ऑक्टोबर दरम्यानच्या प्रत्यक्ष हजेरीचा आधार घेतला जाईल. तर, २१ ते ३१ ऑक्टोबर या उर्वरित दिवसांसाठी ‘संभाव्य हजेरी’ गृहीत धरून पूर्ण ३१ दिवसांचे वेतन अदा केले जाईल.
केवळ मूळ वेतन देऊन ठेकेदारांची जबाबदारी संपणार नाही. वेतनासोबतच कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ विहित मुदतीत व वेळेत शासकीय खात्यात जमा करणे ठेकेदारांवर बंधनकारक राहील. मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी कामगारांचे वेतन वेळेत दिले आहे की नाही, याची कसून तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. सर्व कामगारांना वेतन मिळाल्याची खातरजमा करून त्याचा अहवाल कामगार कल्याण विभागाकडे तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खातेप्रमुख व विभागप्रमुखांवर असणार जबाबदारी
या परिपत्रकाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांना थेट जबाबदार धरण्यात आले आहे. आपल्या अधिनस्त असलेल्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे होणार पालन
दरम्यान, यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीसाठी असणारी वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून वाढवून थेट २५ हजार रुपये केली आहे. या नव्या नियमानुसार कंत्राटी कामगारांच्या ईपीएफची नवी गणना करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, सणाच्या काळात पगारासोबतच कर्मचाऱ्यांचा ईपीएफ वेळेत भरला जावा, या मुद्द्यावर अतिरिक्त आयुक्तांनी विशेष भर दिला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालिकेतील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा