मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : माता-बालमृत्यूच्या प्रत्येक घटनेची होणार सखोल तपासणी

Pune News :पुणे,महाराष्ट्र मिरर : माता किंवा बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारात कुठे अडथळे आले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय करता येतील, याचा सखोल तपास आता करण्यात येणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

माता-बालमृत्यूच्या प्रत्येक घटनेची होणार सखोल तपासणी
माता-बालमृत्यूच्या प्रत्येक घटनेची होणार सखोल तपासणी

Pune News : जिल्ह्यापासून तालुका व वॉर्डस्तरापर्यंत समित्यांमार्फत कारणमीमांसा; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

Pune News :पुणे,महाराष्ट्र मिरर : माता किंवा बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारात कुठे अडथळे आले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय करता येतील, याचा सखोल तपास आता करण्यात येणार आहे. पुण्यासह राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात माता व बालमृत्यूच्या घटनांच्या अन्वेषणासाठी जिल्ह्यापासून तालुका आणि वॉर्डस्तरापर्यंत समित्यांची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील माता व बालमृत्यूच्या प्रत्येक घटनेची कारणमीमांसा अधिक बारकाईने होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

माता व बालमृत्यूची केवळ नोंद करण्याऐवजी त्यामागील वैद्यकीय, आरोग्यसेवा तसेच अन्य कारणांचा शोध घेण्यावर या यंत्रणेत भर देण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय ग्रामीण व शहरी माता व बालमृत्यू अन्वेषण कृती समिती तसेच तांत्रिक अन्वेषण समित्यांची रचना करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणेलाही या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

मृत्यूच्या घटनांची वैद्यकीय कारणमीमांसा अधिक तज्ज्ञाधारित व्हावी, यासाठी तज्ज्ञांचा सहभाग वाढविण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या प्रतिनिधींचा समित्यांमध्ये समावेश करण्याची तरतूद आहे. त्यामुळे उपचारपद्धती, वेळेत मिळालेली आरोग्यसेवा आणि संभाव्य वैद्यकीय त्रुटींचा अधिक सखोल अभ्यास करता येणार आहे.

पुण्यात आरोग्य सेवा आयुक्तालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच महिला व बालविकास विभागाची या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका राहणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागांचाही समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मृत्यूचे कारण शोधून उपाययोजना
मृत्यूच्या प्रत्येक घटनेत काय चुकले, उपचार वेळेत मिळाले का, आरोग्यसेवेत कोणते अडथळे आले आणि भविष्यात अशा घटना कशा टाळता येतील, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी केवळ आकडेवारी नोंदविण्याऐवजी कारण शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य मिळणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/


शेअर करा