मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : पुण्यात हुंड्यासाठी आयटी अभियंता महिलेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime :पुणे: हुंड्याच्या सततच्या मागण्या आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका ३३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शहरात समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात हुंड्यासाठी आयटी अभियंता महिलेची आत्महत्या
पुण्यात हुंड्यासाठी आयटी अभियंता महिलेची आत्महत्या

Pune Crime : पगाराचे पैसे सासरच्यांना देणे, माहेरचा फ्लॅट सासूच्या नावावर करणे आणि सासऱ्यांसाठी १ कोटी रुपयांचा नवीन फ्लॅट मागणे यांसारख्या मागण्यांसाठी सातत्याने छळ केला जात होता

Pune Crime :पुणे: हुंड्याच्या सततच्या मागण्या आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका ३३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शहरात समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत तृष्णा यांचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. तृष्णा या उच्चशिक्षित असून आयटी क्षेत्रात नोकरी करत होत्या. मात्र, लग्नापासूनच त्यांच्या पगाराचे सर्व पैसे सासरच्या मंडळींना हाताळणीसाठी द्यावेत, यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकला जात होता. एवढ्यावरच न थांबता, माहेरकडील फ्लॅट सासूच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला गेला. तसेच, सासऱ्यांच्या नावावर तब्बल एक कोटी रुपयांचा नवीन फ्लॅट खरेदी करून देण्यासाठी पती व सासरच्या इतर सदस्यांकडून तृष्णा यांचा वारंवार छळ केला जात होता, असा गंभीर आरोप वडिलांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

सततच्या या मानसिक व शारीरिक त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून तृष्णा २०२१ पासून आपल्या माहेरी राहत होत्या. दरम्यान, त्यांच्या पतीने दुसऱ्या विवाहासाठी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता, ज्याचा कायदेशीर खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेच्या आणि सततच्या मानसिक तणावातून आलेल्या नैराश्येतून तृष्णा यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून पतीसह पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या या वाढत्या घटना रोवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आणखी कडक पावले उचलली जावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा