मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : कोंढव्यात सील तोडून फ्लॅट ताब्यात; प्रविण ओसवाल दाम्पत्यावर गुन्हा दाखल

येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

M
mubarak

1 मिनिट वाचन

PRAVIN OSWAL PUNE
pravin oswal pune

  • येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • पुणे, (Maharashtra Mirror) Pune Crime News : साठेखत करूनही पाच वर्षांमध्ये व्यवहार पूर्ण न करता थेट फ्लॅटचा ताबा घेण्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. महापालिकेने कर थकबाकीमुळे सील केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याप्रकरणी प्रविण ओसवाल आणि त्यांची पत्नी भारती ओसवाल यांच्यावर येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    PRAVIN OSWAL PUNE
    pravin oswal pune

    या प्रकरणी प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रविण ओसवाल (रा. मडोल टॉवर्स, कोंढवा) आणि भारती ओसवाल यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश जैन हे बांधकाम व्यावसायिक असून कोंढवा येथे ‘मंडोत टॉवर्स’ ही इमारत त्यांनी उभारली आहे. प्रविण ओसवाल यांच्याशी यापूर्वी व्यवहार झाल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला. ३१ डिसेंबर २०२० रोजी स्टॅम्प ड्युटी भरून २७ एप्रिल २०२१ रोजी दहाव्या मजल्यावरील फ्लॅटसाठी साठेखत करण्यात आले. Pune Crime News

    फ्लॅटची किंमत ७० लाख रुपये ठरविण्यात आली होती. त्यापैकी २० लाख १० हजार रुपये अ‍ॅग्रीमेंटच्या वेळी देण्यात आले, तर उर्वरित रक्कम सात महिन्यांत देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही.

    Pravin Oswal Kondhwa Pune Fir for Take Illegal possesion over sealed flat

    शेअर करा