Pune Crime News : कोंढव्यात सील तोडून फ्लॅट ताब्यात; प्रविण ओसवाल दाम्पत्यावर गुन्हा दाखल
येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1 મિનિટ વાંચન

पुणे, (Maharashtra Mirror) Pune Crime News : साठेखत करूनही पाच वर्षांमध्ये व्यवहार पूर्ण न करता थेट फ्लॅटचा ताबा घेण्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. महापालिकेने कर थकबाकीमुळे सील केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याप्रकरणी प्रविण ओसवाल आणि त्यांची पत्नी भारती ओसवाल यांच्यावर येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रविण ओसवाल (रा. मडोल टॉवर्स, कोंढवा) आणि भारती ओसवाल यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश जैन हे बांधकाम व्यावसायिक असून कोंढवा येथे ‘मंडोत टॉवर्स’ ही इमारत त्यांनी उभारली आहे. प्रविण ओसवाल यांच्याशी यापूर्वी व्यवहार झाल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला. ३१ डिसेंबर २०२० रोजी स्टॅम्प ड्युटी भरून २७ एप्रिल २०२१ रोजी दहाव्या मजल्यावरील फ्लॅटसाठी साठेखत करण्यात आले. Pune Crime News
फ्लॅटची किंमत ७० लाख रुपये ठरविण्यात आली होती. त्यापैकी २० लाख १० हजार रुपये अॅग्रीमेंटच्या वेळी देण्यात आले, तर उर्वरित रक्कम सात महिन्यांत देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही.
Pravin Oswal Kondhwa Pune Fir for Take Illegal possesion over sealed flat
