मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Bribe News : वनसंरक्षकाला 1 लाखांची लाच स्वीकारताना जाळ्यात

• तक्रारदार यांनी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Beed Bribe News

•तक्रारदार यांनी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा भरला परंतु कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल न करण्याकरिता 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वनसंरक्षक, यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पुणे :- पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा बुजवला. परंतु,गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली होती. एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वनसंरक्षक गोविंद रामेश्वर निर्डे (वय 32) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यानी त्यांच्या पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा बुजवला. परंतु लोकसेवक गोविंद निर्दे यांनी तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार 3 एप्रिल तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. शुक्रवार 4 एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक गोविंद निर्दे यांनी तक्रारदाराकडे त्यांचे विरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरीता सुरवातीस 2 लाख रुपयाचे लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. वनसंरक्षक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम श्रीनाथ रसवंती गृह, वीर फाटा, सासवड, येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.दयानंद गावडे पोलीस आयुक्त उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.यांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा: Thane Rape News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधाम तरुणास 20 वर्षे सक्तमजुरी

शेअर करा