मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील १७ अधिकाऱ्यांवर सीआयडीने केले गुन्हे दाखल

Pune Crime News : अल्पवयीन मुलांची गाडीच्या बोनेटला बांधून धिंड काढणे व बेकायदेशीर कस्टडीत मारहाण करणे भोवले; ॲट्रॉसिटीसह जन्मठेपेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल https://maharashtramirror.com/ Pune Crime News

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील १७ अधिकाऱ्यांवर सीआयडीने केले गुन्हे दाखल
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील १७ अधिकाऱ्यांवर सीआयडीने केले गुन्हे दाखल

Pune Crime News : पुणे, धनश्री ओतारी

Pune Crime News : अल्पवयीन मुलांची गाडीच्या बोनेटला बांधून धिंड काढणे व बेकायदेशीर कस्टडीत मारहाण करणे भोवले; ॲट्रॉसिटीसह जन्मठेपेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल https://maharashtramirror.com/ Pune Crime News

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एका हत्या प्रकरणातील संशयित अल्पवयीन मुलांची पोलीस गाडीच्या बोनेटला दोरखंडाने बांधून, भररस्त्यात अवमानकारक धिंड काढल्याप्रकरणी आणि पोलीस कोठडीत बेकायदेशीरपणे ठेवून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime News

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (पवार) यांच्यासह एकूण १७ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवर दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या ('फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट'नंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार सीआयडी पोलीस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांनी स्वतः फिर्यादी होऊन हे गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व आरोपींवर 'ॲट्रॉसिटी ॲक्ट', बाल न्याय कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील गंभीर आणि जन्मठेपेची तरतूद असलेल्या अत्यंत कडक कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

नेमके काय घडले होते?


भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै २०२६ मध्ये गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या होत्या. पोलीस सूत्रांनी व सीआयडीच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जुलै २०२६ दरम्यान आंबेगाव पठार पोलीस चौकी आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

तपास अहवालानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी बाल न्यायमंडळाच्या नियमांचे उघड उल्लंघन करत अल्पवयीन संशयितांना विहित वेळेत न्यायालयासमोर हजर न करता तब्बल ३ ते ४ दिवस बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. या दरम्यान आरोपींना बांबू आणि बॅटनने मारहाण करण्यात आली.

इतकेच नव्हे तर, २१ जुलै रोजी संशयित अल्पवयीन मुलांना पोलीस वाहनाच्या बोनेटला दोरखंडाने बांधून, आंबेगाव पठार पोलीस चौकी ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यादरम्यान भररस्त्यात त्यांची धिंड काढण्यात आली. या वेळी लाउडस्पीकरवरून "हेच हत्येतील आरोपी/खूनी आहेत" असे घोषित करत त्यांची ओळख उघड करण्यात आली आणि नागरिकांसमोर त्यांना मारहाण करत माफी मागण्यास भाग पाडले गेले.

अमानुष कृत्यावर मानवी हक्क आयोगाचा चाबूक


या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'फॅक्ट फाइंडिंग' तपास सुरू केला.

आयोगाच्या तपासात पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये, जनरल डायरी आणि लॉगबुकमध्ये अनेक खोट्या नोंदी करून बाल न्यायमंडळाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. तसेच, काही पीडित अल्पवयीन मुले ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे माहीत असतानाही त्यांना सार्वजनिकरीत्या अपमानित करून मानहानी करण्यात आली. मानवी हक्क आयोगाने दिलेल्या अहवालानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तात्काळ हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले.

दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीनंतर दोन स्वतंत्र प्रथम खबर अहवाल नोंदवण्यात आले. आरोपींना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून मारहाण करणे, अपमानित करणे यासाठी वपोनि मानसिंग पाटील, पोउनि आण्णा दराडे, पोउनि निलेश मोकाशी यांच्यासह १३ पोलिसांवर बीएनएस कलम ११५(२), १२७(२), १२७(३), १३१, ३५२, ३५१(२), १९८, १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तर अल्पवयीन मुलांची बोनेटवर बांधून धिंड काढणे, मारहाण, खोटे पुरावे तयार करणे यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सपोनि गणेश मोहिते, सपोनि स्नेहल थोरात, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा भिसे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा नोंदवला गेला.

नामांकित पोलिसांची नावे आरोपींच्या यादीत
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मानसिंग पाटील (तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक), गणेश मोहिते (सहाय्यक पोलीस निरीक्षक), स्नेहल थोरात (बालकल्याण पोलीस अधिकारी / सपोनि), आण्णा दराडे (पोलीस उपनिरीक्षक), निलेश राजेंद्र मोकाशी (पोलीस उपनिरीक्षक), फकीर (पोलीस उपनिरीक्षक), सुनील हनवते, दिनेश टापके (पोलीस हवालदार), सागर बोरगे, सोहम शेंडकर, राहुल औधकर, मितेश चोरमोले, रवींद्र गायकवाड, संदीप आगळे, मंगेश पवार, सुतार, पवार आणि सुवर्णा भिसे (पोलीस अंमलदार) यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी करत आहे. खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांवरच अशा प्रकारे ॲट्रॉसिटी आणि गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा