मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC News : ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा

पिंपरी, महाराष्ट्र मिरर PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

PCMC News : ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

पिंपरी, महाराष्ट्र मिरर PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रत्येकी एका झोपडपट्टीची निवड करून तेथे १५ ऑगस्टपर्यंत ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.PCMC News

या उपक्रमाअंतर्गत कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, घरगुती कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, परिसराची स्वच्छता तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमात महिला बचत गट, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथील यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर आपल्या हद्दीतील योग्य झोपडपट्टीची निवड करावी आणि योग्य नियोजन करून १५ ऑगस्टपूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम तसेच उप आयुक्त डाॅ.प्रदीप ठेंगल यांना दिले आहेत.PCMC News

महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

मोशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजन

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे सुरक्षित, विकेंद्रित आणि शाश्वत व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उपक्रमामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास, उगमस्थानी वर्गीकरणाला चालना मिळण्यास तसेच परिसर अधिक स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.PCMC News

शेअर करा