Pune Crime : दिल्ली क्राईम ब्रँचच्या नावाने पाषाण येथील वृद्धाला ५.७६ लाखांचा चुना
Pune Crime पुणे: दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून गुन्हा मागे घेण्याच्या बहाण्याने एका ६७ वर्षीय वृद्धाची ५ लाख ७६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पाषाण परिसरात घडली आहे.
1 मिनिट वाचन

Pune Crime : संशयितांनी गुन्हा आणि केस बंद करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले
Pune Crime पुणे: दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून गुन्हा मागे घेण्याच्या बहाण्याने एका ६७ वर्षीय वृद्धाची ५ लाख ७६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक व बँक खातेधारकांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
पाषाण येथील रहिवासी असलेल्या ६७ वर्षीय इसमाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ ते ५ सप्टेंबर २०२६ दरम्यान सायबर भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून फिर्यादींशी संपर्क साधला. "आम्ही दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत आहोत, तुमच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला आहे," असे सांगून आरोपींनी वृद्धाला घाबरवले.https://maharashtramirror.com/ Pune crime
त्यानंतर, "तुमच्यावरील हा गुन्हा आणि केस बंद करण्यासाठी काही पैसे भरावे लागतील," असे सांगून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. कायदेशीर अडचणीत सापडण्याच्या भीतीने वृद्धाने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर एकूण ५,७६,००० रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे दिल्यानंतरही आरोपींकडून अधिक पैशांची मागणी होऊ लागल्याने आणि कोणतेही अधिकृत कागदपत्र न मिळाल्याने वृद्धाला फसवणुकीचा संशय आला.https://maharashtramirror.com/ pune crime
आपली दिशाभूल करून पैसे उकळल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल आणि बँक खातेधारकांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८(४), ३(५) आणि आयटी ॲक्ट कलम ६६ डी नुसार गुन्हा नोंदवला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे करत आहेत.




