मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : ओमेगा-३ च्या सेवनाने मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होण्याची शक्यता

Mumbai news :मुंबई : गर्भवती महिलांच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश केल्यास मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ओमेगा-३ च्या सेवनाने मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होण्याची शक्यता
ओमेगा-३ च्या सेवनाने मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होण्याची शक्यता

Mumbai news :मुंबई : गर्भवती महिलांच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश केल्यास मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे. डोकोसाहेक्सेनॉईक अॅसिड (डीएचए) या ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या सेवनामुळे मुदतपूर्व जन्माशी संबंधित बालमृत्यू रोखण्यास मदत होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. भारतातही या संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित चाचण्या घेण्याचा विचार केला जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या ऑस्टिन येथील शाखेतील शास्त्रज्ञांनी कॅन्सस विद्यापीठ आणि केंटकी विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने हे संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘पीएलओएस मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

मुदतपूर्व जन्मामुळे बालमृत्यूचा धोका

गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म झाल्यास त्याला मुदतपूर्व प्रसूती म्हणतात. अशा बाळांची पूर्ण वाढ झालेली नसल्याने त्यांना विविध आरोग्यविषयक गुंतागुंतींचा आणि मृत्यूचा धोका अधिक असतो. संशोधनात नमूद केलेल्या २०२० मधील आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३० लाख २० हजार मुदतपूर्व जन्मांची नोंद झाली होती. जगभरातील मुदतपूर्व जन्मांपैकी २० टक्क्यांहून अधिक जन्म भारतात होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांचे जगण्याचे प्रमाण वाढविणे हे आरोग्य व्यवस्थेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.

माशांच्या तेलातून मिळते डीएचए

डोकोसाहेक्सेनॉईक अॅसिड (डीएचए) हे ओमेगा-३ प्रकारातील महत्त्वाचे फॅटी अॅसिड आहे. ते प्रामुख्याने तेलकट मासे आणि माशांच्या तेलात आढळते. आहारातून किंवा पूरक आहाराच्या स्वरूपात डीएचएचा पुरेसा पुरवठा केल्यास मुदतपूर्व प्रसूतीचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असे संशोधनातून सूचित होते. हा उपाय परिणामकारक आणि किफायतशीर ठरल्यास मुदतपूर्व जन्मामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

या संशोधनाचे लेखक प्रा. कुमार कोथापल्ली आणि प्रा. टॉम ब्रेन्ना यांनी भारतात या निष्कर्षांच्या आधारे पुढील चाचण्या घेण्याची गरज व्यक्त केली आहे. भारतीय महिलांमध्ये डीएचएच्या पूरक आहाराचा परिणाम तपासल्यास या उपायाची परिणामकारकता अधिक स्पष्ट होऊ शकेल. तथापि, मुदतपूर्व प्रसूती रोखण्यासाठी डीएचएचा वापर कितपत प्रभावी ठरतो, हे निश्चित करण्यासाठी पुढील संशोधन आणि चाचण्या आवश्यक आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा