मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कात्रज-नवले पूल मार्गावर बस शेड अभावी प्रवासी हैराण; अपघातांचा धोका वाढला

Pune News : पुणे - कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण जवळपास पूर्ण झाले असले, तरी सध्या सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कात्रज-नवले पूल मार्गावर बस शेड अभावी प्रवासी हैराण; अपघातांचा धोका वाढला
कात्रज-नवले पूल मार्गावर बस शेड अभावी प्रवासी हैराण; अपघातांचा धोका वाढला

Pune News : पुणे - कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण जवळपास पूर्ण झाले असले, तरी सध्या सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर सर्व्हिस रोड तयार करण्यात आला असून पीएमपीएमएल बससाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, आंबेगाव येथील अभिनव कॉलेजसमोरील बस थांब्यावर प्रवाशांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. येथे बस शेड किंवा निवारा नसल्याने नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हात तासन् तास बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
त्यातच अनेक बस गाड्या सर्व्हिस रोडऐवजी थेट हायवेवरून निघून जात असल्याने प्रवाशांची मोठी धावपळ होते. याशिवाय, रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हायवेवरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या उघड्या लाईनवरून प्रवाशांना कसरत करत जावे लागते. या लाईनवर सुरक्षित जाळी किंवा बॅरिकेट्स लावले गेलेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच या उघड्या लाईनमध्ये चारचाकी आणि दुचाकी अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
या सर्व प्रकारामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने प्रशासनाने तात्काळ या समस्येची दखल घेऊन बस थांब्यावर निवारा उभारावा आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

“आंबेगाव बुद्रुक येथे अनेक वर्षांपासून बसथांबा नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. रस्ता रुंदीकरणानंतर जुना बसथांबा हटवण्यात आला असून, बॅरिकेड्समुळे प्रवाशांना महामार्गाच्या कडेला उभे राहून बस पकडावी लागते. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, पादचाऱ्यांसाठीही सुरक्षित मार्ग नाही. वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने तातडीने बसथांबा उभारावा; अन्यथा विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.”

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा