मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gjya Marne | धक्कादायक ! गजा मारणे सोबत पोलीसांची मटण पार्टी : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले चौघांना निलंबित

पोलीस आयुक्तांची कठोर भूमिका

M
mubarak

1 मिनिट वाचन

gjya marne

  • पोलीस आयुक्तांची कठोर भूमिका
  • पुणे, दि. १४ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी

    पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे Gjya Marne याच्या सोबत मटण पार्टी करणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून थेट पोलीस अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. Pune Crime News

    पुण्याहून सांगली कारागृहात गजा मारणे याला पोलीस बंदोबस्तात घेऊन जात असताना कणसे ढाब्यावर मटण पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने पुन्हा पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित केले.

    पोलीस संरक्षणात मारणे यास सांगलीला नेत असताना 'कनसे ढाब्या'वर पोलिसांनी मटण पार्टी केली होती. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही पाहणी केली. यानंतर सगळा प्रकार समोर आला. गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News

    हेही वाचा: PUNE CRIME NEWS : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या धाकाने पर्वती 'शांत' : एका वर्षात तब्बल ११ गुंडांवर MPDA

    हेही वाचा: Deepak Mankar | दीपक मानकर यांच्याकडून शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा !

    शेअर करा