मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE CRIME NEWS : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या धाकाने पर्वती 'शांत' : एका वर्षात तब्बल ११ गुंडांवर MPDA

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया पर्वती हद्दीतील गुन्हेगारी संपुष्ठात आणण्यासाठी कडक कारवाया

M
mubarak

1 मिनिट वाचन

PARVATI POLICE STATION

  • पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया
  • पर्वती हद्दीतील गुन्हेगारी संपुष्ठात आणण्यासाठी कडक कारवाया
  • पुणे, दि. १३ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी

    PUNE CRIME NEWS : पुण्यात गुंडगिरी, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पर्वती हद्दीत एकाच वर्षात ११ गुंडावर MPDA कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या धाकाने गुन्हेगारी शांत झाल्याची चर्चा आहे. आज जनता वसाहत येथील गुन्हेगार वैभव सुनील मोरे यास कळंबा कारागृह कोल्हापूर येथे १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. PUNE CRIME NEWS

    पुणे शहरात गॅंगवॉर, वाहन तोडफोड, गुन्हेगारीच्या घटना होत असताना पर्वती सारख्या संवेदनशील हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (SR. POLICE INSPECTOR NANDKUMAR GAIKWAD) यांनी १ वर्षात ११ गुंडांना स्थानबद्ध केले आहे. तसेच महाराष्ट्र्र पोलिस कायदा कलम ५५,५६ प्रमाणे १६ प्रस्ताव दाखल करून २२ गुन्हेगारांना तडीपार करून पर्वती पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे .

    पुणे शहरात गॅगवार ची सुरुवात दत्तवाडी मधून झाली होती, पोलिस स्टेशन चे हद्दीत ८०% भाग हा मिश्र वस्तीचा असून जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, वेगवेगळ्या टोळ्या आणि त्यातून घडणारे शरीराविरूध्दचे गुन्ह्याचे प्रमाण जास्त होते , परंतु वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि अधिकारी व अंमलदार यांनी कठोर प्रतिबंधक कारवाया करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे.

    हेही वाचा: Pune Spa Sex Racket Busted : बाणेर येथे २४ थाय स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट : मॅनेजर, जागामालकासह ४ विरुद्ध गुन्हा दाखल

    शेअर करा