मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

’बँकेचे कार्ड घेतल्याचा’ बनाव करून लुटमार करणारी टोळी जेरबंद

गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कुटर जप्त करण्यात आल्या आहेत

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

’बँकेचे कार्ड घेतल्याचा’ बनाव करून लुटमार करणारी टोळी जेरबंद

गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कुटर जप्त करण्यात आल्या आहेत

पुणे: “तुम्ही आमचे बँकेचे कार्ड घेतले आहे, आम्हाला तुमची झडती घेऊ द्या,” अशी बतावणी करून एका पादचाऱ्याला लुटणाऱ्या चार सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी परिसरातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी तब्बल ७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून या टोळीचा छडा लावला. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कुटर जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी दिनेश बाळू मंडपे (वय ३३), रोहन रमेश सूर्यवंशी (वय ३१), लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर (वय ४६) आणि संतोष राम कंपा (वय ३१, सर्व रा. पिंपरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १२ एप्रिल २०२६ रोजी सुतारवाडी येथील साई रेसिडेन्सीसमोर ही घटना घडली होती. या संदर्भात बाणेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी सुतारवाडीतून पायी जात असताना दोन काळ्या रंगाच्या स्कुटरवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. “आमचे बँकेचे कार्ड हरवले आहे आणि ते तुम्हीच घेतले आहे,” असे म्हणून आरोपींनी फिर्यादीची जबरीने अंगझडती घेण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातील ४० हजार रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला.

बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळापासून चोरट्यांच्या माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणादरम्यान एकूण ७२ सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर आरोपी पिंपरीतील मिलिंदनगर भागात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना बेड्या ठोकल्या. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीतील रकमेचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा अधिक तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, गणेश रायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Gang arrested for robbing by pretending to 'take bank cards'

शेअर करा