मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे पडले महागात

बावधनमध्ये एक जण गंभीर जखमी

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे पडले महागात

बावधनमध्ये एक जण गंभीर जखमी

पुणे: विरुद्ध दिशेने आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना बावधन येथील सर्व्हिस रोडवर २ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्‍या सुमारास घडली.


 
या प्रकरणी कमलेश पुरुषोत्तम पाटील (३५, बावधन) यांनी शनिवारी (९ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मैलारि शिवाजी हुलसोगि (३१, इस्कॉन कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी फिर्यादी आपल्या ॲक्टिव्हा गाडीवरून (एमएच 12 एक्सडब्ल्यू  9260) मित्राला सोडून घरी जात होते. चेलाराम हॉस्पिटलजवळ आले असता आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच 11 सीआर 4583) भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून चालवली. या धडकेत कमलेश पाटील गंभीर जखमी झाले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा