मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crime News : हरवलेले दहा मोबाईल मालकांना परत

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : हरवलेले विविध कंपन्यांचे दहा मोबाईल फोन मुंढवा पोलिसांनी शोधून ते मालकांना परत केले.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Crime News : हरवलेले दहा मोबाईल मालकांना परत

मुंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : हरवलेले विविध कंपन्यांचे दहा मोबाईल फोन मुंढवा पोलिसांनी शोधून ते मालकांना परत केले. परराज्यातील पोलिस ठाण्यांशी समन्वय साधत हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. ज्याची एकूण अंदाजे किंमत एक लाख ९० हजार रूपये आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.Crime News

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०२५ आणि २०२६ या कालावधीत हरवलेल्या मोबाईल फोनबाबत सीईआयआर पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद साळुंखे यांनी मोबाईलच्या आयएमईआय (IMEI) क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित मोबाईलचा मागोवा घेतला. त्यानंतर विविध राज्यांतील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांना याबाबत माहिती सादर करण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही पूर्ण करून सर्व दहा मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.Crime News

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सागर गोडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार विनोद साळुंखे, रुपेश तोडेवर आणि सचिन बोराटे यांनी सहभाग घेतला. Crime News

Crime News

शेअर करा