मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या कथित व्यवहाराच्या आरोपप्रकरणी एसआयटीचे पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल; दोन तास चौकशी, पेन ड्राइव्ह सील

• जरांगे यांच्याकडून संबंधित ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राइव्ह सुपूर्द; पंचनामा करून पेन ड्राइव्ह सील करत नोंदवला जबाब

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

SIT team arrives at Manoj Jarange Patil’s residence in connection with allegations of a ₹500 crore transaction

जालना :- कथित 500 कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी सार्वजनिक केलेल्या ऑडिओ क्लिपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाला वेग दिला आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी एसआयटीचे सहा अधिकारी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पथकाने जवळपास दोन तास जरांगे यांची सखोल चौकशी करत संबंधित ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राइव्ह ताब्यात घेऊन सील केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर एसआयटीकडून तपास सुरू

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कथित 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेली एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपमधील संभाषणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्य समोर आणण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

याच तपासाचा भाग म्हणून बुधवारी सायंकाळी सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचे पथक थेट अंकुशनगर येथील जरांगे यांच्या निवासस्थानी पोहोचले. ऑडिओ क्लिपची तांत्रिक सत्यता पडताळणे, संभाषणातील आवाजांची ओळख पटवणे आणि रेकॉर्डिंगचा मूळ स्रोत शोधणे, या दिशेने एसआयटीने तपास सुरू केला आहे.

ऑडिओ क्लिपचा पेन ड्राइव्ह पंचनाम्याद्वारे सील; तांत्रिक विश्लेषणानंतरच स्पष्ट होणार क्लिपमधील सत्यता

जवळपास दोन तास चाललेल्या या चौकशीदरम्यान एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ऑडिओ क्लिपसंदर्भात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे विविध प्रश्न विचारून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. तसेच, जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राइव्ह तपास पथकाकडे सुपूर्द केला.

अधिकाऱ्यांनी हा पेन ड्राइव्ह ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा केला आणि जरांगे यांच्या स्वाक्षरीने तो सील केला आहे. आता या पेन ड्राइव्हमधील ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) व तांत्रिक तपासणी केली जाणार असून, त्यातून नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा