मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण कारवाई तूर्तास स्थगित; एकनाथ शिंदेंच्या फोननंतर अश्विनी वैष्णव यांचे आदेश, जेसीबी माघारी

• 101 बांधकामांवर कारवाईसाठी पथक व पोलीस बंदोबस्त दाखल; स्थानिक रहिवासी, अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा विरोध

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण कारवाई तूर्तास स्थगित

मुंबई :- प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील 101 अतिक्रमित बांधकामांवर होणारी पाडकाम कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर तात्काळ स्थगित करण्यात आली आहे. या हस्तक्षेपानंतर कारवाईसाठी प्रभादेवी परिसरात दाखल झालेले जेसीबी आणि तोडकाम पथक माघारी फिरले आहे.

गुरुवार व शुक्रवारी नियोजित होती कारवाई; पुनर्वसनाशिवाय पाडकाम न करण्याच्या मागणीवर रहिवासी ठाम

प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील 101 अतिक्रमित बांधकामांवर गुरुवारी आणि शुक्रवारी पश्चिम रेल्वेकडून कारवाई करण्यात येणार होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तासह पाडकाम पथक आणि जेसीबी प्रभादेवीत पोहोचले होते.

मात्र, स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला तीव्र विरोध करत पुनर्वसन झाल्याशिवाय जागा सोडणार नसल्याची भूमिका घेतली. त्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर हेही रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांनी फोनवरून संपर्क साधून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी असलेले पथक आणि पोलीस तात्काळ माघार घेण्यास तयार नव्हते.

एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण आणि पुनर्वसनाची भूमिका

या घडामोडीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “गेल्या आठवड्यात एसआरए (SRA), गृहनिर्माण विभाग आणि रेल्वे मंत्रालयाची बैठक झाली होती. त्या बैठकीत मी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. हे रहिवासी 50-60 वर्षांपासून येथे राहत असून त्यांचे योग्य पुनर्वसन करावे लागेल. रेल्वे विभाग आणि गृहनिर्माण विभाग मिळून पुनर्वसन करतील. रेल्वेचा आर अँड डी विभाग आणि एसआरए धोरणानुसार डीपीआर (DPR) तयार होईपर्यंत ही कारवाई होऊ नये, अशी भूमिका आम्ही मांडली होती.”

मात्र, असे ठरलेले असतानाही रेल्वेचे अधिकारी कारवाईसाठी गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिंदे यांनी थेट अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई तूर्तास थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आता स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

शेअर करा