मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

Thane News : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे 16 सदस्य जाहीर; एकनाथ शिंदेंच्या ‘धक्कातंत्रा’ने दिग्गजांना धक्का, सभापती निवडीचा मार्ग मोकळा

• तब्बल 10 महिन्यांनंतर समितीची रचना निश्चित; मिनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना डावलल्याची चर्चा

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

thane municipal corporation standing committee 16 members election

Thane :- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 10 महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावे शुक्रवारी (20 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली आहेत. या घोषणेमुळे ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शिवसेनेच्या सदस्यांची निवड करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धक्कातंत्र’ वापरत अनेक दिग्गज व चर्चेतील नगरसेवकांना धक्का दिला असून, राजकीय अंदाज पूर्णपणे चुकवले आहेत.

पक्षीय बलाबलानुसार निवडलेली 16 नावे

शिवसेनेचे सर्वाधिक 9, भाजपचे 3, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 2 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) व एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य

सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत विविध पक्षांचे सदस्य निश्चित करण्यात आले आहेत.

शिवसेना (9): दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी.

भाजप (3): भरत चव्हाण, मृणाल पेंडसे आणि कमल चौधरी.

राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट (2): पल्लवी जगताप आणि यासीन कुरेशी.

राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट (1): सुहास देसाई.

एमआयएम (1): शोएब डोंगरे.

दिग्गजांना डावलले; नाराजी उफाळण्याची चिन्हे

सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी यांना पहिल्या वर्षी संधी नाही; प्रदीप पूर्णकर हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मिनाक्षी शिंदेही बाहेर

स्थायी समितीवर चार ते पाच वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठांना तसेच अनुभवी व नवीन चेहऱ्यांची सांगड घालून संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पुढील महिन्यात होणाऱ्या सभापती निवडणुकीत शिवसेनेचाच सभापती विराजमान होणार असल्याने या समितीवरील निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र, सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर आणि संजय भोईर यांसारख्या अनेक चर्चेतील नगरसेवकांना पहिल्या वर्षी संधी मिळालेली नाही; यातील अनेकजण सभापतीपदाच्या शर्यतीत होते. तसेच, प्रदीप पूर्णकर हत्याप्रकरणामुळेच मिनाक्षी शिंदे यांनाही स्थायी समितीत स्थान दिले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अनपेक्षित नावांना संधी दिल्याने डावलण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा