मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

केवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्व

परवडणाऱ्या घरांच्या बाजारपेठेकडून प्रीमियम निवासी क्षेत्राकडे पिंपरी-चिंचवडची वाटचाल; डिझाइन, आरोग्यदायी जीवनशैली, सुविधा आणि सामुदायिक वास्तव्याला प्राधान्य

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

केवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्व
परवडणाऱ्या घरांच्या बाजारपेठेकडून प्रीमियम निवासी क्षेत्राकडे पिंपरी-चिंचवडची वाटचाल; डिझाइन, आरोग्यदायी जीवनशैली, सुविधा आणि सामुदायिक वास्तव्याला प्राधान्य

पुणे : गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहराची ओळख परवडणाऱ्या घरांच्या बाजारपेठेपासून प्रीमियम निवासी क्षेत्राकडे अशी बदलत आहे. पूर्वी घर खरेदी करताना परवडणारी किंमत, औद्योगिक आणि आयटी क्षेत्रांशी असलेली जवळीक तसेच मोठ्या क्षेत्रफळाचे घर या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते. मात्र, आता गृहखरेदीदारांचा दृष्टिकोन बदलत असून, केवळ घराचे क्षेत्रफळ आणि प्रति चौरस फुटाचा दर यापेक्षा जीवनशैली, आकर्षक रचना, आधुनिक सुविधा आणि एकूणच निवासाचा अनुभव यांना अधिक महत्त्व दिले जात आहे.

वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मोशी आणि चिखली या परिसरांमध्ये हा बदल प्रकर्षाने दिसून येत आहे. पूर्वी शहराच्या बाहेरील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरांचा आता विकसित निवासी क्षेत्रांमध्ये समावेश होत आहे. सुधारित दळणवळण व्यवस्था, रोजगाराच्या संधी, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा तसेच वाढत्या व्यावसायिक आणि किरकोळ बाजारपेठेमुळे या भागांचा विकास वेगाने होत आहे.

प्रीमियम घरांची बदलती व्याख्या

पुण्याच्या गृहबांधणी क्षेत्रात होत असलेल्या व्यापक बदलांचे प्रतिबिंब या परिस्थितीत दिसून येते. ANAROCK रिसर्चच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये पुण्यात नव्याने सादर झालेल्या निवासी प्रकल्पांपैकी ३९ टक्के घरे ८० लाख ते १.५ कोटी रुपये या किमतीच्या श्रेणीतील होती. २०२४ मध्ये हे प्रमाण ३१ टक्के होते. तर १.५ कोटी ते २.५ कोटी रुपये या किमतीच्या घरांचा वाटा ५ टक्क्यांवरून दुप्पट होत १० टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून उच्च मूल्याच्या घरांकडे विकासकांचा वाढता कल स्पष्ट होतो.

ही आकडेवारी पुण्याच्या एकूण निवासी बाजारपेठेची असली, तरी पीसीएमसीमध्येही ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचे चित्र दिसत आहे. येथे विकासकांकडून अधिक वेगळ्या आणि आधुनिक संकल्पनांवर आधारित निवासी प्रकल्प सादर केले जात आहेत.

आजचा गृहखरेदीदार केवळ पारंपरिक अर्थाने आलिशान घर शोधत नाही. दैनंदिन जीवनातील सोयीसुविधा, विचारपूर्वक केलेली घरांची रचना, आरोग्य आणि फिटनेससाठीच्या सुविधा, मनोरंजनाची साधने तसेच कुटुंब आणि समाजातील इतर सदस्यांसोबत चांगले जीवन जगता येईल, अशा निवासी वातावरणाला अधिक महत्त्व दिले जात आहे.

आयश्‍वर्यम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्रवाल म्हणाले, "गेल्या दोन दशकांत पीसीएमसीमधील निवासी बाजारपेठेत मोठे बदल झाले आहेत. पूर्वी घर खरेदी करताना परवडणारी किंमत, ठिकाण आणि घराचे क्षेत्रफळ या गोष्टी प्रमुख मानल्या जात होत्या. मात्र, आता ग्राहक प्रकल्पाची गुणवत्ता, सुविधा, वास्तुरचना, मोकळ्या जागा आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनशैलीकडेही तितक्याच गांभीर्याने पाहत आहेत. एकूणच राहणीमानाचा चांगला अनुभव मिळत असल्याचे लक्षात आल्यास ग्राहक अधिक गुंतवणूक करण्यासही तयार आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper