मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

Kurla Phoenix Mall Mumbai News : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीला बेदम मारहाण; चित्रफित व्हायरल झाल्यानंतर आठ अल्पवयीन ताब्यात

• Kurla Phoenix Mall Couple Assault छायाचित्र टिपताना छेडछाडीला विरोध केल्याने मारहाण; घाटकोपर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तपास सुरू

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Kurla Phoenix Mall Mumbai News

मुंबई :- कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणीला आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (20 नोव्हेंबर) घडली आहे Kurla Phoenix Mall. या मारहाणीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला असून, आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी सायंकाळी उद्यानात घडली घटना; मोबाइलमध्ये चित्रित झालेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या उद्यानात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उद्यानात फिरण्यासाठी गेलेले तरुण आणि तरुणी छायाचित्र टिपत असताना आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी त्यांना गाठले. यावेळी काही मुलांनी तरुणीची छेड काढली व अश्लील शेरेबाजी केली(Kurla Phoenix Mall).

तरुण-तरुणीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलांनी दोघांना बेदम मारहाण केली (Kurla Phoenix Mall). ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केली आणि शुक्रवारी ही चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.

घाटकोपर पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास ; चित्रफित समोर आल्यानंतर पीडितांचा शोध; तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आठ अल्पवयीन ताब्यात

समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली चित्रफित घाटकोपर पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्या तरुण-तरुणीचा शोध घेतला. पीडितांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवून या प्रकरणाचा अधिक तपास घाटकोपर पोलिसांकडून सुरू आहे

शेअर करा