मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

कॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकी

तळेगाव दाभाडे पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकी
तळेगाव दाभाडे पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : किराणा दुकानात कॅरीबॅग मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून नशेत असलेल्या तरुणाने वृद्धाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

या प्रकरणात संभाजी तात्याबा राऊत (६०, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बिराजदार (तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किराणा आणि दूध घेऊन कॅरीबॅग मागण्यासाठी थांबले असताना दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने बाहेर येऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सामान घेऊन जात असताना आरोपीने समोरून पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी अंगावर घालून उजव्या पायाला गंभीर दुखापत केली. जमिनीवरील दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचा मुलगा रामलिंग याने आडवे येत तो अडवला, ज्यात त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी गाडी घेऊन पळून गेला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper