मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

Bhiwandi Food Poisoning : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 116 जणांना अन्नातून विषबाधा; 21 लहान मुलांचा समावेश, रुग्णालयांमध्ये उपचार सुरू

• वंजारपट्टी नाका परिसरातील ‘ए. के. शोरमा’ दुकानातील प्रकार; बाधितांचा आकडा 17 वरून थेट 116 वर, महापालिकेच्या कारवाईनंतर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Bhiwandi Food Poisoning

भिवंडी :- भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली असून, बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 116 वर पोहोचली आहे. सुरुवातीला लहान मुलांसह 17 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते; Bhiwandi Food Poisoning मात्र त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या नागरिकांचा आकडा वाढत जाऊन तब्बल 116 जणांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. यामध्ये 21 लहान मुलांचा समावेश असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात 103 रुग्णांवर उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात असलेल्या ‘ए. के. शोरमा’ या दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विषबाधा झालेल्या एकूण 116 रुग्णांपैकी 103 जणांवर स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 103 रुग्णांमध्ये 50 पुरुष, 32 महिला आणि 21 लहान मुलांचा समावेश आहे. Bhiwandi Food Poisoning याशिवाय, ठाणे सिव्हिल रुग्णालयात 2 आणि खासगी रुग्णालयात 2 रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा झालेल्या 9 जणांना उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेची धडक कारवाई; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत वंजारपट्टी नाका येथील संबंधित शोरमा दुकानावर धडक कारवाई केली आहे. तसेच, नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन व पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा