मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने २.७० लाखांना लुटले

नोटराईज दस्तऐवज बनवून लावला चुना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने २.७० लाखांना लुटले

नोटराईज दस्तऐवज बनवून लावला चुना

पिंपरी: मावळ तालुक्‍यातील डोणे येथील प्लॉट विकण्याचे आमिष दाखवून नोटराईज दस्तऐवज बनवून एका व्यक्तीची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २३ जुलै २०१९ ते ९ मे २०२६ या कालावधीत मारुंजी येथील गुडविन सिटी लँडमार्क डेव्हलपर्सच्या कार्यालयात घडली.

याप्रकरणी जितीन बाळू भोसले (३९, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पूर्णचंद्र स्वैन (अशोक नगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मौजे डोणे (ता. मावळ) येथील प्लॉट क्रमांक २८१ हा ४ लाख ९८ हजार २४० रुपयांना विकण्याचे ठरवले होते. फिर्यादीने वेळोवेळी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर आरोपीने नोटराईज 'एमओयू' केला, मात्र त्यात जाणूनबुजून सर्व्हे नंबर न टाकता केवळ प्लॉट नंबरचा मोघम उल्लेख केला. पैसे घेऊनही प्लॉटचे खरेदीखत करून दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा