मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटनअजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुककेरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक

पुण्याने महाबळेश्वरला टाकलं मागे

थंडीचा जोर वाढला; शहरात पारा ११.३ अंशांवर

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुण्याने महाबळेश्वरला टाकलं मागे
थंडीचा जोर वाढला; शहरात पारा ११.३ अंशांवर

पुणे : पुणेकरांनो, यंदा थंडीच्या बाबतीत पुण्याने चक्क महाबळेश्वरलाच मागे टाकलं आहे! शहरात थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानाचा पारा थेट ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचरी थंडी, असं वातावरण सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

पुण्यात किमान तापमानात तीन अंशांची घट

शुक्रवारी (ता. २०) पुण्यात किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. विशेष म्हणजे, पुण्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी नोंदवलं गेलं. एका दिवसात किमान तापमानात सुमारे तीन अंशांची घट झाली आहे. तर शहरात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. त्यामुळे दिवसा उन्हाचा अनुभव येत असला, तरी रात्री मात्र थंडीचा प्रभाव वाढत आहे.

जळगाव राज्यात सर्वाधिक थंड

राज्यातील तापमानाचा विचार केला, तर जळगावमध्ये सर्वांत कमी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुणे आणि परिसरातही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः पहाटे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे.

सोमवारपासून थंडीचा जोर कमी होणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी (ता. २१) पुण्यात कमाल तापमान ३२, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. सोमवारपासून (ता. २३) तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज असून कमाल तापमान ३३, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे सध्या जाणवणारा गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper