लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक
पुण्यातील प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
1 मिनिट वाचन

पुणे : पुण्यातील प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या कारवाईविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दुकानांचा एकही बोर्ड तोडू देणार नाही, असा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दुकानांचे फलक आणि अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या कारवाईला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, दुकानांचे बोर्ड तोडण्यास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लक्ष्मी रोड हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या व्यापारी भागांपैकी एक आहे. या परिसरात कपडे, दागिने, पादत्राणे आणि विविध वस्तूंची शेकडो दुकाने आहेत. दुकानांचे फलक हे व्यवसायाच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि प्रशासनाची भूमिका यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




