मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटनअजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुककेरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक

वारजेत भरधाव कारची धडक; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू

वेदभवनसमोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; ४७ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

वारजेत भरधाव कारची धडक; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू
वेदभवनसमोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; ४७ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात अंदाजे ३० वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वेदभवनसमोर सातारा लेनवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक अरुण अष्टीकर (वय ४७, रा. ओव्हलनेस्ट सोसायटी, ज्ञानेश्वरी उद्यानाजवळ, वारजे) हा त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवत होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने आणि अविचाराने वाहन चालवत असताना त्याने रस्ता ओलांडणाऱ्या एका अनोळखी पादचाऱ्याला जोरदार धडक दिली.

या धडकेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अंमलदार भुजंग इंगळे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार कारचालक शशांक अष्टीकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper