मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
केरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेकगाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादात चालकाला दगडाने मारहाणपार्किंगच्या वादातून सोसायटी सेक्रेटरीची सभासदाला मारहाणतारेचे कुंपण घालण्यावरून झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने हल्ला

भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!

सातही जागांवर पुरुषांची वर्णी; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा
सातही जागांवर पुरुषांची वर्णी; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

पिंपरी, महाराष्ट्र मिरर: पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करायचं, कठीण काळात पक्षाची साथ द्यायची आणि पदाची वेळ आली की मात्र संधी मिळायची ती नेत्यांच्या जवळच्या लोकांना... पिंपरी-चिंचवड भाजपमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून आता असाच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सात स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर झाली असून, या सातही नावांमध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सात नावांची घोषणा; जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी

महापालिकेच्या सात स्वीकृत नगरसेवकपदांसाठी सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीसाठी पक्षातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी दावेदारी केली होती. मात्र, अंतिम यादीत अनेक इच्छुकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्षासाठी कठीण काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा डावलल्याची भावना व्यक्त होत आहे.

नेत्यांच्या गटांना झुकतं माप?

या निवडींमध्ये आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या राजकीय गटांशी संबंधित व्यक्तींना संधी मिळाल्याची चर्चा आहे. राजेश पिल्ले यांच्या निवडीमागे आमदार अमित गोरखे यांचं पाठबळ असल्याची, तर जयनाथ काटे यांच्या निवडीमध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा नेत्यांशी जवळीक आणि स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व ठरलं का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सात जागा, पण एकाही महिलेला संधी नाही!

या निवडीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे सातही जागांवर पुरुषांचीच निवड झाली आहे. महापालिकेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद असताना स्वीकृत नगरसेवकपदांवर एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. मात्र, निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या जागांसाठीचं ५० टक्के आरक्षण स्वीकृत नगरसेवकपदांना त्याच पद्धतीने लागू होत नाही. तरीही महिला प्रतिनिधित्वाचा विचार झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निष्ठावंतांचा पुन्हा अपेक्षाभंग?

एकीकडे सात स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर झाली आहेत, तर दुसरीकडे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा आहे. त्यामुळे या निवडींमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढणार की पक्षातील इच्छुकांची समजूत काढली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper