मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटनअजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुककेरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक

क्रेडिट कार्ड प्रोटेक्शनच्या नावाखाली महिलेची ३.९३ लाखांची फसवणूक

कार्ड ॲक्टिव्हेशनच्या बहाण्याने ओटीपी घेतला; कॅम्पमधील ५५ वर्षीय महिलेला गंडा

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

क्रेडिट कार्ड प्रोटेक्शनच्या नावाखाली महिलेची ३.९३ लाखांची फसवणूक
कार्ड ॲक्टिव्हेशनच्या बहाण्याने ओटीपी घेतला; कॅम्पमधील ५५ वर्षीय महिलेला गंडा

पुणे, महाराष्ट्र मिरर : क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन ॲक्टिव्हेशन करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कॅम्प परिसरातील ५५ वर्षीय महिलेची तब्बल ३ लाख ९३ हजार ३५७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. आरोपीने फोन करून महिलेचा विश्वास संपादन केला आणि क्रेडिट कार्डवरील ओटीपी मिळवून आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला. कॅम्प परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला एका मोबाइलधारकाने फोन केला. क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन ॲक्टिव्हेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आमिष त्याने दाखवले.

महिलेचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ३ लाख ९३ हजार ३५७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलधारक तसेच विविध बँक खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद सलगलकर करीत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper