मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : सुप्रिया सुळे संतप्तएसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवालशिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीविक्रोळीत 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी कापड विक्रेत्याला अटक; पुन्हा परिसरात दिसताच नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यातसात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्त

न्यायालयाच्या जवळ आरोपीवर जीवघेणा हल्ला

शिवाजीनगर कोर्टात भरदिवसा एकावर गोळीबार आणि कोयत्याने वार; परिसरात पोलीस चौकी, पोलिसांची उपस्थिती तरीही हल्लेखोरांची झाली हिंमत

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

न्यायालयाच्या जवळ आरोपीवर जीवघेणा हल्ला
शिवाजीनगर कोर्टात भरदिवसा एकावर गोळीबार आणि कोयत्याने वार; परिसरात पोलीस चौकी, पोलिसांची उपस्थिती तरीही हल्लेखोरांची झाली हिंमत

महत्वाचे मुद्दे

*कात्रज येथील शुभम सुभाष चव्हाण खून प्रकरणातील आरोपी असलेल्या मंदार किवळेवर हा हल्ला झाला

*जमिनीच्या वादातून शुभमचा खून झाल्यानंतर पोलिसांनी मंदार किवळे याच्यासह इतरांना सोलापूर येथून ताब्यात घेतले होते

*जामीन मंजूर झाल्यानंतर मंदार काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता

*बुधवारी तो तारखेच्या निमित्ताने शिवाजीनगर न्यायालयात आला होता

*५-६ हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत

*शुभम चव्हाण खून प्रकरणाच्या सूडातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे

पुणे, धनश्री ओतारी

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर बुधवारी (दि. २५) दुपारी सव्वाच्या सुमारास गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. न्यायालयाच्या आवारातच कायद्याचा धाक संपल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (३६) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कात्रज येथील शुभम सुभाष चव्हाण (२८) खून प्रकरणातील आरोपी असलेल्या मंदारवर जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा हल्ला झाला.

हल्ल्याचे कात्रज कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी मंदार किवळे याच्यासह इतरांना सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर मंदार काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. बुधवारी तो न्यायालयीन कामकाजासाठी आणि तारखेच्या निमित्ताने शिवाजीनगर न्यायालयात आला होता.

न्यायालयाच्या गेट क्रमांक चार जवळ दुपारी दबा धरून बसलेल्या ५ ते ६ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला गोळीबार करत हल्लेखोरांनी दहशत माजवली आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मंदारच्या हातांवर गंभीर जखमा झाल्या असून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळावरून पिस्तूल आणि काडतुसे तसेच इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. शुभम चव्हाण खून प्रकरणाच्या सूडातून हा प्रकार घडला असावा, या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper