मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
'संविधान सन्मान दौडी'निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदलखुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई26 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित राहणार,मोर्चावर निर्णयाची शक्यता“गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय”; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोलासपना चौधरी यांचा घटस्फोटासाठी अर्ज; ‘नाते टिकणारच नव्हते’हनुमान म्हणजे भारताचे ‘आयर्न मॅन’ : नमित मल्होत्रा

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई

दिवाळीत फटाक्याच्या वादातून मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई
दिवाळीत फटाक्याच्या वादातून मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार

पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवाळीत फटाके वाजवताना रिक्षाचे चाक फटाक्यावरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. गणेश लक्ष्मण शेट्टी (वय १९, रा. ताडीवाला रोड, पुणे) या आरोपीचे नाव आहे.

समर्थ पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पुणे रेल्वे स्थानकावर येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद जगताप यांना मिळाली. या माहितीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना माहिती देण्यात आली. त्यांनी बातमीची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राऊत आणि पथकाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव गणेश लक्ष्मण शेट्टी असल्याचे सांगितले आणि त्याने दाखल गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार प्रमोद जगताप, दांगडे, अनुसे, भुजबळ आणि आशिष खरात यांनी ही कारवाई केली.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper