मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीविक्रोळीत 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी कापड विक्रेत्याला अटक; पुन्हा परिसरात दिसताच नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यातसात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्तमला ती सीतेच्या भूमिकेत अजिबात योग्य वाटली नाही” : तनिषा मुखर्जीप्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो ‘मिस युनिव्हर्स २०२६’लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

उदगीर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या 25 कोटींच्या प्रस्तावासाठी 20 टक्के कमिशन मागितल्याचा दावा; एसीबीकडे तक्रार देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एका शैक्षणिक व प्रशिक्षण प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तक्रारदार नरसिंग उरगीर यांनी केला आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा करत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.

काय आहे नेमका आरोप? 72 व्या मजल्यावर लाच मागितल्याचा दावा

पत्रकार परिषदेत तक्रारदार नरसिंग उरगीर यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. त्यांच्या दाव्यानुसार, लातूर येथील आरती सेवाभावी संस्थेमार्फत उदगीर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी 25 कोटी रुपयांचा परिपूर्ण प्रस्ताव 6 ऑक्टोबर 2025 रोजी समाजकल्याण मंत्रालयात सादर करण्यात आला होता.त्यानंतर महिन्याभरात मंत्र्यांनी आपल्याला बैठकीसाठी मुंबईतील ‘नाथानी हाईट्स’ येथील 72 व्या मजल्यावरील खासगी निवासस्थानी रात्री 11.30 ते पावणेबाराच्या सुमारास बोलावल्याचे उरगीर यांनी सांगितले. तेथे भंडारे नावाच्या ओएसडींसमोर प्रस्तावाबाबत विचारणा करत, प्रस्तावाच्या 20 टक्के म्हणजेच सुमारे 5 कोटी रुपये द्यावे लागतील आणि ती रक्कम दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर होणार नाही, असे मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचा आरोप उरगीर यांनी केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देऊनही कारवाई नसल्याचा दावा; संजय शिरसाट यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्रतीक्षेत

नरसिंग उरगीर यांनी पुढे दावा केला की, लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा मंत्र्यांकडे गेले असता त्यांच्या ओएसडींनी “तुम्ही वरळीला (एसीबी कार्यालयात) गेले होते का?” अशी विचारणा करत आता प्रस्ताव मंजूर होणारच नाही, असे सुनावल्याचे त्यांनी म्हटले आहे.या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, छोटे प्रकल्प आणि संस्थांच्या कामांसाठीही पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला. एसीबीकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper